नवीन रोजगारासाठी भूमिपुत्रांना संधी द्या : आमदार विनय कोरे
बांबवडे : सध्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय स्थलांतरित होत असून, भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगार उपलब्धतेसाठी भूमिपुत्रांना संधी द्या, अशा आशयाची मागणी आमदार विनय कोरे यांनी शासनाकडे केली आहे.
सध्या अनेक शहरातून परप्रांतीय मंडळी आपापल्या गावी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळाल्यास, राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असेही आमदार कोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.