साळशीतील हनुमान मंदिराच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
बांबवडे : साळशी (ता. शाहुवाडी ) येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराचा तृतीय वर्धापनदिन शुक्रवार (ता. २८ ) आज रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
येथील गावाच्या मध्य ठिकाणी असलेले ग्रामदैवत लोकवर्गणीतून पंचवीस लाख रूपये खर्चाच्या हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली असून, या मदिरात हनुमानाची दगडी पाषाणातील मुर्ती तसेच राम, लक्ष्मण, सिता या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. या मंदिरात दर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता भक्तिभावाने आरती केली जाते.दरवर्षी ‘अक्षय्य तृतिया’ या दिवशी मंदिरांचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यावर्षी या मंदिराचा तिसरा वर्धापनदिन असून या वर्धापनदिनानिमित पहाटे ५ ते ७ पर्यत मुर्तीना अभिषेक, सकाळी ९ते ११पर्यत सत्यनारायण महापुजा, दुपारी ३ते ७पर्यत महाप्रसाद तर सायंकाळी ६ ते ७ पर्यत रामभक्त बलराम कटारिया कोल्हापूर यांचे प्रवचन व रात्री ८ते १० ह.भ.प. वेदांताचार्य कृष्णानंद शास्त्री महाराज यांचे किर्तन आहे.
या वर्धापनाचे संयोजन माजी उपसभापती महादेवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान भक्त मंडळाचे अध्यक्ष गुंगा पाटील, दिनकर पाटील, सखाराम पाटील, उदय पाटील, कृष्णा पाटील, संजय पाटील, सुभाष बोरगे, उत्तम मगदूम, शिवाजी राबाडे, बापू पाटील हे करीत आहे. या उत्सवांचा साळशी परिसरातील
भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन मंडळाने केला आहे