congratulationsसामाजिक

” न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ” या दुकानाचा उद्घाटन सोहळा संपन्न<


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं तरुण उद्योजकांनी ” न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ” या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाचे थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनास गावचे सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, तसेच गेली पाच पंचवार्षिक सातत्याने निवडून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश नारकर बापू यांनी सुद्धा या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. तसेच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांनी सुद्धा या तरुण उद्योजकांना भेटून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सुरुवातीला मोबाईल रिचार्ज करण्यापासून त्यांनी आपल्या व्यवसायास सुरुवात केली. नंतर त्यांनी मोबाईल अॅक्सेसरीज व मोबाईल विक्री सुरु केली. आणि आता त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री च्या व्यवसायात नव्याने पदार्पण केले आहे.


त्यांच्या या दुकानात फ्रीज, एलईडी,टिव्ही, वॉशिंग मशीन, विविध कंपनींचे मोबाईल्स, तसेच त्यांचे अॅक्सेसरीज, यासह अनेक इलेक्ट्रोनिक्स वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. तसेच वस्तू सुलभ हफ्त्यांवर मिळण्यासाठी विविध फायनान्स कंपनी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


असे हे अमोल लाटकर व संदीप शेळके या तरुण उद्योजकांना अनेक व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक ,व ग्रामस्थांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!