स्वातंत्र्यलढ्यात ‘ पत्रीसरकर ‘ चे महत्वाचे योगदान :क्रांतिसिंह पाटील यांना अभिवादन
शिराळा / प्रतिनिधी :
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या ‘ पत्रीसरकर ‘ म्हणजेच प्रतीसरकारने , ब्रिटिशांना ‘ सळो कि पळो ‘ करून सोडले होते. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपुर्ण आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दादर (मुंबई) येथील क्रांतिसिंह नाना पाटील मंडई मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त झालेल्या अभिवादन
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार शिवाजीराव नाईक, आमदार आशिष शेलार, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप आदी मान्यवरांची यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रांतिसिंह नाना पाटील मंडई उत्कर्ष भाजीपाला व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘पत्रीसरकर ‘ चे महत्वाचे योगदान होते.या पत्रीसरकर म्हणजेच प्रतीसरकारच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले होते. त्यांच्या नावाने चालू असलेल्या या भाजी मंडईतील प्रलंबित असणाऱ्या समस्या कमीत कमी वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठीचा प्रस्ताव तयार करून आमच्याकडे द्यावा.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले कि , तत्कालीन दक्षिण सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील या थोर क्रांतीकारकाने स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान अतुलनीय होते. मुंबई महानगरपालिकेने भाजी मंडईला क्रांतीसिंह नाना पाटलांचे नाव देवून वाळवा तालुक्याचा गौरवच केला आहे. त्याबद्दल आम्ही महापालिकेला धन्यवाद देतो.
या भाजी मंडईमधील अडी-अडचणी सोडविण्यासाठी सरकार दरबारी सर्वोपरी प्रयत्न करू.