पंचायत समितीच्या योजना ग्रामस्थांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचवणार- श्री अभयसिंह चौगुले
बांबवडे : पंचायत समिती च्या माध्यमातून पंचायत समिती च्या २० कलमी कार्यक्रमाची पुरती अंमलबजावणी सर्व सामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहचवणे हे माझे ध्येय आहे. सामान्य जनतेच्या हक्काच्या योजना त्यांच्या उंबऱ्यापर्यंत नेणे , माझे काम आहे. यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून, मला एक संधी द्यावी, मी आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. यासाठी माझे चिन्ह घड्याळ आहे या चीन्हासामोरील बटन दाबून मला आपल्या सेवेची संद्धी द्यावी, असे मत बांबवडे पंचायत समिती चे उमेदवार श्री अभयसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
ते प्रचारादरम्यान विविध गावांना व ग्रामस्थांना भेटी देत होते. या प्रसंगी ते एसपीएस न्यूज शी बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, मी आज ग्रामस्थांच्या भेटी साठी आलो आहे. त्यांच्या अडचणी आणि व्यथा मला जाणून घ्यायच्या आहेत. त्यांना होणारा त्रास समजून घेवून त्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे. काही गावात पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यास त्रास होतो. अशा ठिकाणी भराव अथवा साकव उभा करता येईल का? असा माझा विचार आहे. काहीठिकाणी आरोग्याची उपकेंद्रे आहेत, पण असुविधा आहे. अशाठिकाणी आरोग्याच्या सुविधा पोहोचविणे हे माझे काम राहील. पंचायत समिती च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती या त्यांच्यापर्यंत कशा लवकर पोहचतील, व त्याचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना कसा होईल, यासाठी मी सदैव तत्पर राहीन, हे माझे वचन आहे.
याचदरम्यान बांबवडे जिल्हापरिषद च्या उमेदवार सौ. राजकुंवर गायकवाड या सुद्धा बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उभ्या आहेत. त्यांचे चिन्ह सुद्धा घड्याळ आहे. त्यांना देखील त्यांच्या घड्याळ या चीन्हासामोरील बटन दाबून सेवेची संधी द्यावी. असे सुद्धा श्री अभयसिंह चौगुले यांनी सांगितले.
