पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा- प्रवीण प्रभावळकर
मलकापूर प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहुवाडी तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून संपन्न होणार आहे. यामध्ये देशातील गोर-गरीब , शोषित आणि वंचित समाजाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय मोदीजी साध्य करीत आहेत. यासाठी विविध जनकल्याणकरी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने हा पंधरवडा संपन्न होणार आहे,अशी माहिती प्रवीण प्रभावळकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा काळात योजना समिती निश्चित करण्यात आली आहे, यावेळी १६ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा भाजपा यांच्या सुचनेनुसार शाहुवाडी तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक प्रवीण प्रभावळकर , भाजपा अध्यक्ष विजय रेडेकर, सरचिटणीस संजय खोत, नगरसेवक भारत गांधी, युवा मोर्चा संदीप पाटील, उपाध्यक्ष महिपती पाटील, कोषाध्यक्ष हरी पाटील, उदय कोकरे-देसाई, माजी अध्यक्ष दाजी चौगुले, सचिन लाड, अशोक कुंभार, रमेश चव्हाण, विनायक पाटील, मुकुंद पाटील, रवींद्र यादव, रोहित पास्ते, जयसिंग पाटील,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.