पंत प्रधानांच्या अनेक योजना कल्याणकारी, तर शाहुवाडी पर्यटनासाठी पोषक – केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल
शाहुवाडी प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या सर्व योजना या कल्याणकारी आणि सुवर्णमय अशा आहेत. समाजातील शेवटच्या घटकांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतात.असे मत प्रतिपादन केंद्रीय न्याय व विधी राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल, यांनी केले.

शाहुवाडी पंचायत समिती तालुका शाहुवाडी च्या सभागृहात अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले. आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर श्री बघेल पत्रकरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वरील मत प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना श्री बघेल पुढे म्हणाले कि, जीवन विमा सुरक्षा योजना, उज्वला गॅस योजना, पंतप्रधान सडक योजना, पंतप्रधान आवास योजना, ,पंतप्रधान आयुष्मान योजना, अशा विविध योजना तळागाळातील घटकांसाठी असून, त्या योजना समाजातील तळागाळातील लोकांसाठी याचा उपयोग होत आहे. आज या देशातील ८० करोड लोकांना तीन वर्षांपासून मोफत गहू, तांदूळ देणारा जगातील भरत हा, एकमेव देश आहे. काही राज्यात लोकांची तोंडे पाहून धान्याचे वाटप करण्यात आले. परंतु आपल्या राज्यात तसे झालेले नाही. इथे सर्वांना समान न्याय समजून, वाटप करण्यात येत आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपण आपल्या योजना पुरविण्यात यशस्वी झाले आहे.

शाहुवाडी तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत पोषक असून, येथील वातावरण खूप आल्हाददायक असून, पर्यटनासाठी आपण जरूर ते सर्व प्रयत्न करू. यावेळी शाहुवाडी इथं मिनी एमआयडीसी बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री बघेल म्हणाले कि, याबाबत प्रस्ताव तयार करून पाठविल्यास, आपण त्याचा पाठपुरावा करू,.असेही श्री बघेल यावेळी बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आयुक्त कादंबरी बलकवडे , उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी अमित माळी, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, गटविकास अधिकारी रामदास बघे, पोलीस निरीक्षक विजय पाटील, भाजप पदाधिकारी राजू प्रभावळकर, नगराध्यक्ष अमोल केसरकर, भाजप तालुकाध्यक्ष सुनील रेडेकर, तालुका उपाध्यक्ष दाजी चौगुले, आरपीआय तालुकाध्यक्ष विश्वास कांबळे, पोपट दळवी, विनायक कदम, सरपंच, पदाधिकारी, अधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.