पत्रकार दिनाच्या पत्रकार बांधवांना लाख लाख शुभेच्छा.: शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज
बांबवडे : ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित त्यांना विनम्र अभिवादन. तसेच या मराठी पत्रकार दिनाच्या आमच्या सर्व पत्रकार बांधवांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज व मुकुंद पवार आणि कुटुंबियांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.
पत्रकार हा एक समाजाचा आधार असतो. कोणत्याही वाईट रूढी परंपरा अथवा घटनांवर आपल्या लेखणी च्या माध्यमांतून आसूड ओढतो. याचबरोबर समाजातील चांगल्या आणि योग्य कामांना प्रोत्साहन देतो. अशा सर्व पत्रकारांचे या निमित्त विशेष अभिनंदन..
तसेच ज्यांनी आज फोन द्वारे व्हॉटस अॅप, फेस बुक, तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचा सन्मान केला. अशा सर्वच वंदनीय मंडळींचे मनापासून आभार.
पुनश्च पत्रकार दिनाच्या पत्रकार बांधवांना लाख लाख शुभेच्छा.