शिवारेत आज दारूबंदीसाठी मतदान
बांबवडे ( प्रतिनिधी ) :शिवारे तालुका शाहुवाडी इथं आज दि.२७ मार्च रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळ पर्यंत दारूबंदी साठी मतदान होणार आहे.तरी आपली भावी पिढी निर्व्यसनी व सुदृढ राखण्यासाठी दारूबंदी होणे काळाची गरज आहे.
आजवर दारूमुळे अनेक संसारे उध्वस्त झाल्याची उदाहरणे रोजच्या जिवनात आपल्याला पहायला मिळत आहेत. म्हणून ग्रामीण जनतेच्या संसारात ढवळाढवळ करणारी दारूची बाटली आडवी झाल्याशिवाय लोकांचे संसार मार्गी लागणार नाहीत.
म्हणूनच आज होणाऱ्या दारूबंदीच्या मतदानासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.