परखंदळे त वृक्षारोपण : नव्या पिढीला देवू पर्यावरणाचे दान : रामानंद फौंडेशन आणि परखंदळे ग्रामस्थ
बांबवडे : परखंदळे ता.शाहुवाडी येथील रामानंद फौंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा तसेच विद्यामंदिर परखंदळे च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी फौंडेशन चे अध्यक्ष यशवंत रामचंद्र मगदूम यांच्या सौजन्याने विविध प्रकारची रोपे देण्यात आलीत. तसेच यावेळी श्री मगदूम म्हणाले कि, आपण निसर्गाकडून नेहमीच घेत असतो, परंतु हा निसर्ग पुन्हा निर्माण करणे, हि आपली सामाजिक जबाबदारी आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, आणि पुढील पिढीला एकप्रकारची देणगी मिळेल. पर्यावरणाने जे आपल्या पिढीला दिले, त्याच्या कितीतरी पटीने आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजे, असेही श्री यशवंत मगदूम यांनी सांगितले. यशवंत मगदूम हे पुणे इथं मोठे उद्योजक आहेत. गावातील सामाजिक कार्यात त्यांची नेहमीच काही न काही बांधिलकी असते.
यावेळी मंडल अधिकारी नलावडे, तलाठी श्री घोलप, सरपंच अश्विनी दळवी, ग्रामपंचायत सदस्य सुहास कोल्हापुरे , भिमराव परीट, गावातील सर्व तरुण मंडळे, व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने उद्योजक यशवंत मगदूम यांचे आभार मानण्यात आले.