आजपासून बळीराजा संपावर …
बांबवडे : आजपासून महाराष्ट्रातील बळीराजा संपावर गेलाय. इतर संप आणि शेतकऱ्याचा संप हा निराळा आहे.
शेतकऱ्याचा आवाज शासन ऐकत नाही. शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यासाठीच हा शेतकरी संपावर गेलांय. आजपर्यंत शेतकरी कधी संपावर गेलेला नाही. त्यामुळे याचे परिणाम काय होणार आहेत, याची शासनाला जाणीव नाही. काय करतील चार-पाच दिवसापेक्षा अधिक काळ शेतकरी संपावर टिकणार नाही, अशी भावना शासनाची झाली असावी, त्यामुळे हा संप शासनाने गांभीर्याने घेतलेला नाही. परंतु सगळ्या जगाला पोसणारा शेतकरी स्वतः च्या काही मागण्या मागत असेल, तर त्यात गैर काय आहे? एवढं असूनही, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकलीत कि, शासनाची कीव कराविशी वाटते, आणि लाजही वाटते. भंडारी साहेब म्हणतात, शेतकऱ्याने संप केला तरीही, शासनाला काही फरक पडत नाही. काही कमी जाणवल्यास आम्ही आयात करू. अशा मुक्ताफळं उधळणाऱ्या मंडळींना आपण निवडून दिलंय, याची लाज वाटते. पण हि चूक सुधारण्याची संधी देखील जवळ आली आहे. शासनाने काहीही म्हटलं तरी सर्वसामान्य वर्ग शेतकऱ्याच्या बाजूने आहे.