पवारसाहेबांवर बोलण्याची पडळकरांची लायकी नाही – उत्तम मोरे
बांबवडे : राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांबाबत बोलण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची लायकी नाही. म्हणून शाहुवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस च्यावतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष उत्तम मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
डोणोली ता. शाहुवाडी इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवक नेते युद्धवीरसिंग गायकवाड उपस्थित होते.
यावेळी उत्तम मोरे पुढे म्हणाले कि, तालुक्यात रस्त्यांची आणि गटर्स ची गरज आहे. हि गरज २५/१५ च्या फंडातून पूर्ण करणार आहोत.
कोरोना संक्रमण काळात राष्ट्रवादी च्यावतीने तालुक्याच्या दुर्गम भागात जावून गरजूंना धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी संपूर्ण तालुक्यात वीजबिले भरमसाठ आली आहेत. कोरोना संक्रमण काळात आर्थिकमान सगळ्यांचे बंद आहे. अशावेळी सामान्य जनता वीजबिल भरणार कशी? म्हणूनच हि बिले शासनाने माफ करावीत, असे उदय साखर चे संचालक पंडित शेळके यांनी सांगितले. याबाबत शासनाला निवेदन सुद्धा दिले आहे.
यावेळी शाहुवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष अजित पाटील म्हणाले कि, तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा काढून सामान्य जनतेच्या अडी-अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रवादी गावोगावी पोहचविणार आहोत.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नुतन युवा वर्गाची विविध पदांवर नियुक्ती केली असून, तशा आशयाचे प्रशस्तीपत्र सुद्धा त्यांना यावेळी देण्यात आले.
यावेळी विठ्ठल पोवार, राष्ट्रवादी युवा विद्यार्थी संघटनेचे नेते सुरज बंडगर, सुरज सावंत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवक तालुका अध्यक्ष, रणजीत बंडगर, विक्रम पाटील, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.