१९ ते २५ मे सदगुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
बांबवडे ( प्रतिनिधी ): सद् गुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे-वारणा कपाशी तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर इथं दि.१९ मे ते २५ मे २०१७ पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे सामुदायिक पारायण व अखंड हरीनाम साप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्य निमित्त १९ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ किटे महाराज, २० मे ला गणपती परीट महाराज तळपवाडी , २१ मे हणमंत महाराज कोतोली, २२ मे अंकुश महाराज शिरगाव ,२३ मे तुळशीदास महाराज शिंपे , २४ व २५ मे गणपती परीट महाराज तळपवाडी, यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. तसेच ज्यांना पारायणा करिता संत पंगत, तसेच नाष्टा द्यावयाचा असेल त्यांनी संयोजकांशी संपर्क साधावा,असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.