पालेश्वर धरणाची सुरक्षा भिंतीची पुनर्बांधणी – मनसे च्या पाठपुराव्याला यश
मलकापूर प्रतिनिधी : पालेश्वर धरण येथील पडलेली सुरक्षा भिंत संबंधित खात्याकडून पुन्हा बांधण्यात आली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा चिटणीस जयसिंग पाटील, कोळगाव सरपंच आनंदा कांबळे व ओंकार केसरकर यांनी पालेश्वर धरण इथं भेट दिली होती. त्यानंतर जयसिंग पाटील यांनी मनसे च्या वतीने पडलेली भिंत बांधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचा हा परिणाम असून, भागात सुधारणा होते, याबाबत मनसे च्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या पडलेल्या भिंतीमुळे बऱ्याच गावांना त्याचा धोका होता. पाटबंधारे विभागाच्या वतीने हि भिंत पुन्हा बांधल्यामुळे जयसिंग पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे आभार मानले आहेत.

स्थानिक मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, मनसे पदाधिकारी स्थानिक पत्रकार या सगळ्यांचेच आभार श्री पाटील यांनी मानले. तसेच संबंधित कामाचा पाठपुरावा केल्यानेच हे काम झाले आहे. यामुळे पंचक्रोशीतून जयसिंग पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, तसेच त्यांचे कौतुक हि करण्यात येत आहे.