नगर पंचायत चा निधी कुणाच्या मेहरबानीचा नाही- माजी आम. मानसिंगराव नाईक
शिराळा ( प्रतिनिधी ) : विरोधकांनी विकासाबाबत शिराळकरांच्यावर अन्यायाच केला आहे. नगरपंचायत मध्ये आलेला निधी कुणाच्या मेहरबानीने आलेला नाही,अशी टीका माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
येथील अंबामाता मंदिरात शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या १७ उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मानसिंगराव नाईक पुढे म्हणाले कि,आमदारकी असली किंवा नसली, तरी शिराळ्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. रस्ते, पाणी या मुलभूत सुविधांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न केला आहे. शिराळा इथं नाट्यगृह उभारणे, नव-नवीन उद्योगधंदे वाढवून लोकांच्या हाताला काम मिळवून देणे, शिराळ्याच्या नागपंचमीला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे सांगतानाच नाईक पुढे म्हणाले कि, विरोधकांनी १५ वर्षे आमदारकी असताना काय केले ते दाखवून द्यावे. केवळ आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करण्यापलीकडे, काहीच केले नाही.
यावेळी भीमराव गायकवाड, अॅड. बाबालाल मुजावर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक विजयराव नलवडे यांनी केले.
कार्यक्रमास अॅड. भगतसिंग नाईक, विश्वास कदम, एस.एम. पाटील, एस.के.खबाले, प्रवीण शेटे, देवेंद्र पाटील, सुनील कवठेकर, गजानन सोनटक्के, संभाजीराव गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, के.वय. मुल्ला, संतोष पांगे, गजानन पाटील, सचिन शेटे, प्रताप कदम, डी.एन. मिरजकर, प्रताप यादव, नतेश यादव, उमेश कुलकर्णी, संतोष देशपांडे आदि उपस्थित होते. आभार लालासाहेब तांबीट यांनी मानले.