सामाजिक

पोलीस कर्मचारी शरद पाटील यांचे आकस्मिक निधन : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : रक्षाविसर्जन दि.२९ जुलै रोजी स.९.०० वा.


बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी येथील शरद भगवान पाटील वय २७ वर्षे मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांचे पार्थिवावर आज बुधवार दि.२८ जुलै रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शरद पाटील यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. गुरुवार दि.२९ जुलै रोजी सरूड इथं सकाळी ९.०० वा.रक्षाविसर्जन आहे.


दरम्यान शरद पाटील हे सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी पोलीस दलात दाखल झाले होते. हुशार आणि मितभाषी असलेले शरद यांचा मित्रपरिवार मोठा आहे. शरद यांच्या आकस्मिक निधनाने सरूड पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान शरद यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रेलर मध्ये ठेवून, अंत्ययात्रा काढण्यात आली..या अंत्ययात्रेत अनेक नागरिक तसेच शरद यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सामील झाला होता.


सरूड येथील स्मशान भूमीत शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून, पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्यासहित पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांकडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून स्व.शरद पाटील यांना मानवंदना देण्यात आली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!