शेतकऱ्यांचा कैवारी करतोय आत्मक्लेश :खास.शेट्टीच्या तब्येतीत घसरण -शरीरातील पाणी झाले कमी
बांबवडे : पुण्याहून निघालेल्या आत्मक्लेश यात्रेत शेतकऱ्यांच्या जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेवून निघालेले खासदार राजू शेट्टी यांच्या तब्येतीत वारंवार बिघाड होत आहे. आज ते गोवंडी इथं पोहचले आहेत. दरम्यान त्यांच्या शरीरातील पाणी कमी झालेने, त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.अशी माहिती स्वाभिमानी युवा संघटनेचे अध्यक्ष सागर शंभूशेटे यांनी ‘एसपीएस न्यूज’ शी मोबाईल वरून बोलताना दिली. या एकंदरीत परिस्थितीवरून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात खऱ्या अर्थाने आत्मक्लेश करून घेतला आहे.
राजभवनावर पोहचायला अजून दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान आत्मक्लेश यात्रेत खासदार शेट्टी यांची प्रकृती वारंवार बिघडताना दिसत आहे. असे असले तरीही खासदार शेट्टी यांच्या मनसुब्यात तसूभरही फरक पडलेला नाही. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून सातबारा कोरा करून मिळावा, आदि मागण्यांचा ते शेवट पर्यंत पाठपुरावा करताना दिसत आहे.