प्रत्येक ग्रामदेवतेची पूजा तिरंगा साडी ने बांधावी – आमदार विनय कोरे यांचे आवाहन
बांबवडे : शाहुवाडी – पन्हाळा मतदार संघाचे आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामदेवतेसाठी एक तिरंगा साडी स्वातंत्र्य देवतेच्या आठवणी साठी भेट देण्यात आली आहे. हा उपक्रम मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत च्या ग्राम देवते साठी पोहोच करण्यात येत आहे. तशा आशयाचे पत्र आमदार विनय कोरे यांच्याकडून ग्रामपंचायत ला देण्यात आले आहे.

पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी या मातीत आपले रक्त सांडले, तीच मातृभूमी आपली माता आहे. आपली संस्कृती आहे. मातृभूमी साठी जगणं , प्रसंगी आत्मार्पण करणं , हा आपला धर्म आहे.

येत्या सोमवारी १५ ऑगस्ट आहे. आपला स्वातंत्र्य दिन आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक गावातील ग्रामदेवी, अथवा कोणतीही देवी असो, तिची तिरंगा साडी मध्ये पूजा बांधण्यासाठी आपल्याला हि तिरंगा साडी देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून सगळ्यांनाच आपल्या स्वातंत्र्यदेवतेची आठवण रहावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. असेही या पत्रात नमूद केले आहे.