सत्तेच्या अहंकारानेच दानवेंचे बेताल वक्तव्य-मुरलीधर जाधव
मलकापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शेतकरी बांधवांना अवमानकारक भाषा वापरली आहे. सत्तेचा अहंकार असल्यानेच, ते अशी बेताल भाषा वापरू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या या वाचाळ शब्दाचा शिवसेनेच्या वतीने ‘ चप्पल मारो ‘ आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. असे मत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.
शाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने मलकापूर येथे ‘ रास्ता रोको ‘ करून, रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘ चप्पल मारो ‘ आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या जीवावर सत्ता उपभोगत असताना, शेतकऱ्यांच्या बद्दलच वाचाळ वक्तव्य करणाऱ्या दानवे ना शेतकऱ्याचा उद्रेक अजून माहित नाही. त्या उद्रेकाची वाट पाहू नका. नाहीतर शेतकऱ्याच्या त्या उद्रेकात सत्तेसाहित नष्ट व्हाल, याची जाणीव ठेवा. असे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आण्णासाहेब भिल्लोरे यांनीही आपल्या मनोगतात तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनात नगरसेवक तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, सुहास पाटील, सत्याप्पा भवान, दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुभाष कोळेकर, राहुल पोवार ,बाबु सोनावळे, तेजस बेंडके, अभिमन्यू पाटील, बाबू चांदणे. आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.