educationalUncategorizedसामाजिक

प्रथम एज्युकेशन फौंडेशन च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबीर संपन्न

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं प्रथम एज्युकेशन फौंडेशन च्या वतीने दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. फौंडेशन च्या वतीने मल्टी ट्रेनिंग स्कील सेंटर कोल्हापूर यांच्या वतीने प्रथम प्लम्बिंग ट्रेड चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.


बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत, यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. म्हणूनच फौंडेशन च्या वतीने कम्युनिटी कँप नं ३ मध्ये ३० दिवसांचा हा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यात आला. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच त्यांना स्थानिक पातळीवर तसेच कोल्हापूर इथं रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रथम फौंडेशन च्या वतीने ट्रेनिंग तसेच प्लेसमेंट मोफत देण्यात येत आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देखील फौंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.


या कार्यक्रमासाठी प्रथम प्लंबिंग प्रोग्राम हेड श्री शिवाजी कदम सर, महाराष्ट्र को-ऑर्डीनेटर आणि कोल्हापूर क्लस्टर हेड श्री सुधाकर सर, सेंटर हेड मनीषा कांबळे मॅडम, शाहुवाडी पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा सुषमा पाटील मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा दाभोळकर, प्लेसमेंट को-ऑर्डीनेटर श्री कृष्णा पांडव सर, प्लंबिंग ट्रेनर श्री कृष्णा देवगुडे सर, शोभा कुंभार मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!