सामाजिक

बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात ६९ % लसीकरण ,तर उपकेंद्रातून ८० % च्या वर लसीकरण


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात दि. ११ एप्रिल २०२१ अखेर ४५ वर्षांवरील नागरिकांना ६९ % लसीकरण केले आहे.


तालुक्यातील बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्र हे सुमारे ६० ते ७० गावांच्या संपर्कात येते. त्यामुळे येथील गर्दी नेहमीच तुडुंब असते. येथील बाह्यरुग्ण विभाग सुद्धा तितक्याच संख्येने चालतो.
या केंद्राशी तीन उपकेंद्र जोडलेली आहेत. यापैकी पिशवी उपकेंद्र ९०%, शित्तूर तर्फ मलकापूर ८९%, सावे ८६ % असे लसीकरण झाले आहे.


बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात ४५ वर्षांवरील ९३९६ पैकी ६५१६ नागरिकांना म्हणजेच ६९ % लसीकरण पूर्ण केले आहे.


येथील डॉक्टर्स, आरोग्यसहायक,आरोग्यसहाय्यीका,परिचारिका, शिक्षक वर्ग असा सर्वच कर्मचारी वृंद युद्ध पातळीवर काम करीत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!