बांबवडे इथं दि.२१ जुलै रोजी उपचार शिबीर – भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्यावतीने गुरुवार दि.२१ जुलै २०२२ रोजी गुडघेदुखी,कंबरदुखी, टाचदुखी याबाबत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बांबवडे ग्रामपंचायत जवळ असलेल्या गाडवे बिल्डींग येथील भास्कर हॉस्पिटल, इथं या उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी यावर उपचार शिबिरात तपासणी फी मोफत असणार आहे. तसेच उपचारासाठी लागणारी औषधे सवलतीच्या दरात पुरविण्यात येतील. तेंव्हा पंचक्रोशीतील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. दिलखुष तांबोळी यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ७२७६००९०५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन भास्कर हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.