बांबवडे इथं ” न्यू ऑरेंज हॉस्पिटल कोविड सेंटर ” चा शुभारंभ संपन्न
बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी इथं न्यू ऑरेंज हॉस्पिटल कोविड सेंटर चा आज जिल्हापरिषद कोल्हापूर आरोग्य समिती चे सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. हे सेंटर मंजूर करण्यात त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू म्हणाले कि, कोरोना संक्रमण काळात ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. कोरोना च्या महामारीमुळे तालुक्यासाहित जिल्हा हादरला आहे. परंतु हा रोग सामान्य आहे. ह्या कोरोना ला घाबरल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ह्या रोगाचा सामना करण्यासाठी मानसिकता प्रबळ असणे, हि खरी काळाची गरज आहे. याचबरोबर वेळेत औषधोपचार झाल्यास या कोरोना वर आपण सहज मात करू शकतो. असेही सभापती हंबीरराव पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
या कोविड सेंटर मध्ये १४ बेड ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापैकी १ बेड एनआयव्ही, तर १० बेड ऑक्सिजन सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. अशी माहिती डॉ.सुभाष पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
या सेंटर मध्ये डॉ. साईप्रसाद एम.डी. मेडिसिन, डॉ.सुभाष पाटील बी.एच. एम.एस., डॉ. विक्रम गावडे बी.ए.एम.एस., डॉ. रमेश कुंभार एम.एस. सर्जन, डॉ.अमित भोसले बी.ए.एम.एस., डॉ. प्रवीण लाड बी.ए.एम.एस.,डॉ. संदीप पाटील बी.एच.एम.एस., डॉ.अश्विनी शेळके बी.ए.एम.एस., आदी डॉक्टर मंडळींसह, करिष्मा घोलप ए.एन.एम., नीलम सातपुते, गणेश सावंत, संगीता कांबळे, सुरेखा काळे, निलेश पावले आदी कर्मचारी इथं सेवा देणार आहेत. हे कोविड सेंटर बांबवडे येथील अंबीरा ओढ्याच्या पलीकडे राजे हॉटेल च्या वर सुरु करण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पंडित शेळके, स्वप्नील घोडे-पाटील, सुजय घोडे-पाटील, याचबरोबर अन्य मान्यवर उपस्थित होते.