बांबवडे चा लॉकडाऊन १० मे पर्यंत वाढवला
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेला लॉकडाऊन ची मुदत १० मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत इथं झालेल्या कोरोना समिती च्या मध्ये ठरविण्यात आले. यामुळे बांबवडे १० मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
दरम्यान १० मे नंतर जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त इतरही दुकाने चालू करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी सरपंच सागर कांबळे,उपसरपंच सयाजी निकम, ग्रामसेवक जी. एस. कमलाकर, तलाठी नसीम मुलाणी, सदस्य विष्णू यादव, सुरेश नारकर, पोलीस पाटील संजय कांबळे, तंटा मुक्ती अध्यक्ष महादेव पाटील,ग्रामोंचायत कोरोना समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.