बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी कंटेंमेंट झोन जाहीर : एक पॉझीटीव्ह
बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील एक इसम कोरोना संक्रमित आढळल्याने, पुन्हा एकदा बांबवडे परिसरात खळबळ उडाली आहे. बांबवडे, डोणोली, आणि खुटाळवाडी अशी तिन्ही गावे प्रतिबंधित (कंटेंमेंट झोन) करण्यात आली आहेत.
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक गुरुवारी संपूर्ण बांबवडे बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील बांबवडे अजूनही गर्दीने ओसंडून वाहत आहे. दरम्यान खुटाळवाडी येथील इसम बांबवडे इथं क्लिनिक चालवत होते. ते पॉझीटीव्ह आल्याने परिसर कंटेंमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.