बांबवडे तील युवकाचा अनोखा वाढदिवस : फ्रेंड्स मोबाईल शॉपी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील एका तरुणाने अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ ,तसेच जीवनावश्यक सामान पुरविले. त्याचबरोबर पर्यावरण जागृती साठी विविध फळझाडांची रोपे सुद्धा दिली. त्या तरुणाचे नाव आहे, अमोल कुमार लाटकर.

एकीकडे रस्त्यावर तलवारीने केक कापण्याच्या घटना आपल्या वाढदिवसानिमित्त घडताना दिसत असताना, या तरुणाने मात्र सर्वच तरुणाई संवेदनाशून्य नसते. हे आपल्या कृत्यातून दाखवून दिले आहे. एकीकडे आपण चांगले व समृद्ध जिवन जगत असताना , अनाथ आश्रमातील मुले कशी जगत असतील , याचे भान आठवत, स्वत:चा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आहे. हा युवक बांबवडे इथं स्वत:ची ‘ फ्रेंड्स मोबाईल शॉपी ‘ चालवीत आहे. सामान्य कुटुंबात जिवन जगत असलेल्या या तरुणाने, अवघ्या तरुणाई पुढे एक नवा वसा घालून दिला आहे.

अमोल च्या वाढदिवसानिमित्त त्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देण्यात आल्या आहेत.