सामाजिक

बांबवडे त अवैध धंदे कार्यालय थाटून सुरु ?:पोलीसांना निवेदन

बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी इथं अवैध धंद्यांना ऊत आला असून, काही ठिकाणी कार्यालय थाटून हे धंदे राजरोसपणे सुरु आहेत.या अवैध धंद्यांवर कारवाई करून येठील्सामाजिक आणि शैक्षणिक समतोल टिकवावा, अशा आशयाचे निवेदन अमर संभाजी निकम यांनी शाहुवाडी पोलीस ठाणे इथं देण्यात आले आहे.
बांबवडे इथं जुगार अड्डे, अवैध मद्य विक्री,यासह गांजा विक्री,तीन पाणी जुगार अशा प्रकारचे धंदे राजरोसपणे सुरु आहेत. सदर मंडळींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलीस अशा लोकांवर कारवाई का करीत नाहीत. हा यक्ष प्रश्न आहे. गाव सुरु व्हायच्या वेशीवरच या धंद्यांची सुरुवात होत आहे. गायरानात देखील कोणीही शेड मारून व्यवसाय करीत आहेत. यामुळे गावाचे गायरान शिल्लक राहणार कि, नाही. हा सुद्धा प्रश्न आहे.महसूल विभागाने सुद्धा या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे.
बांबवडे बाजारपेठ तालुक्यातील सर्वत मोठी बाजारपेठ आहे. इथं अनेक अधिकारी वर्गासह कर्मचारी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. त्यामुळे शालेय वर्ग इथं अधिक आहे. तरुण वर्ग मोठा आहे. हि पिढी गांजा आणि दारूच्या आहारी जाताना दिसत आहे. तरी सदर अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी सुद्धा ग्र्मास्थातून होत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!