१० मे रोजी “शांततेसाठी दौड” : सरूड स्पोर्ट्स फौंडेशन ट्रस्ट
बांबवडे : उद्या १० मे रोजी “सरूड स्पोर्ट्स फौंडेशन ट्रस्ट” च्या वतीने “शांततेसाठी दौड” चे म्हणजेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सकाळी ७.०० वाजता सुरु होणार असून आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते या दौड चे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक रमेश घोलप यांनी दिली.
हि दौड सरूड ते बांबवडे व तिथून परत सरूड अशी होणार असून, याचे अंतर १० किलोमीटर असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देवून गौरवण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतल इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन घोलप यांनी केले आहे.