बांबवडे त बिबट्याचे दर्शन : जनतेने सतर्कता बाळगावी चे आवाहन
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला आहे. त्यातच बिबट्याचे बांबवडे त दर्शन घडल्याने जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभाग नेमकी काय पावलं उचलणार आहेत, हा प्रश्न बांबवडे सहित तालुक्यातील जनतेला पडला आहे.
बांबवडे इथं चौगुले यांचा माळ या शेताजवळ असलेल्या दत्तात्रय परशुराम कांबळे यांच्या विहिरीजवळ बिबट्याचे सलग दोन दिवस दर्शन घडले आहे. विहिरीजवळ संध्याकाळच्या वेळेस दत्तात्रय यांना बिबट्या मुक्त वावर करताना आढळून आला. बिबट्याला पाहताच दत्तात्रय यांनी आरडा ओरडा सुरु केला. दंग्याचा आवाज ऐकताच बिबट्याने तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक ला आलेल्या लोकांना सुद्धा या बिबट्याचे विहिरीजवळ दर्शन घडले.
दरम्यान जनतेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन चौगुले मळा चे शेतकरी उद्योगपती तानाजीराव चौगुले यांनी आवाहन केले आहे. तसेच वन विभागाने देखील कारवाई करावी, याची विनंती केली आहे.