बांबवडे त लवकर च वॉटर एटीएम : श्री विजय बोरगे जि.प.स.
बांबवडे : पिशवी जिल्हा परिषद मतदार संघासाठी शुद्ध थंड व नरम पाण्याच्या एटीएम सेंटर साठी सीएसआर फंडातून ४.५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य श्री विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली. यामुळे मतदारसंघातील अनेक विधायक कामांमध्ये या नव्या शुद्ध पाण्याची नोंदणी झाली आहे.

हे पाण्याचे एटीएम सेंटर बांबवडे येथील व्यापाऱ्यांना तसेच बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. ” आर.ओ. ट्रिटेड वॉटर प्लांट ” हे सामाजिक विकास कार्यक्रम अंतर्गत ‘ विरबॅक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रा.लि. ‘च्या वतीने उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जनतेला शुद्ध मिनरल पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.

एकंदरीत पिशवी जिल्हा परिषद मतदार संघात अधिकाधिक विकासाभिमुख कामे करण्याचा, येथील जि.प.सदस्य श्री विजय बोरगे यांनी चंग च बांधला आहे. त्यांच्या या महत्वाकांक्षेला ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.