महामार्गाची दारू ग्रामीण भागात ?
सोंडोली / (प्रतिनिधी )
सरकारने नविन कायदा अमलात आणुन राज्यामार्गावरील परवाना असलेली देशी दारू दुकाने व बार बंद केली असली तरी त्याचा त्रास ग्रामीण भागाला होवू लागला आहे. उत्पादन शुल्क विभाग मात्र नावासाठीच आहे कि,काय असा प्रश्न ग्रामीण भागात जनतेला पडू लागला आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात म्हणजेच शित्तूर वारुण परीसरात विनापरवाना दारु विक्री जोमात चालू आहे.
या परीसरात दारू विक्री करणाऱ्यांनी फिरती दुकाने चालू केली आसल्याची चर्चा आहे. शित्तूर परीसरात वारणा नदी काठाला जणू दारुचा अड्डाच बनवला आहे. याचा त्रास महिला व अबाल वृद्धांना होत आहे.
या पूर्वी पाच वर्षापासुन शित्तूर वारूण गावांत संपुर्ण दारुबंदी आहे. ही दारु बंदी करताना गावांतील महिला मंडळ व तरुण मंडळानी एकत्र येवून मोठं आंदलन केलं व शाहूवाडी पोलीसांच्या सहकार्याने गावात संपुर्ण दारु बंदी करण्यात गावक-यांना यश आल होतं.
यापुर्वी शित्तूर वारूण परीसरातील डोंगराळ भागातील वाड्या- वस्त्या संपुर्ण दारु मुक्त आहेत. यामध्ये राघूचा वाडा, पेगूचा वाडा , विठ्ठलाईचा वाडा, ढवळेवाडी , कदमवाडी व अन्य वाड्यांचा समावेश आहे.
परंतु शासनाने परवानाधारक दारु दुकाने राज्य मार्गा जवळचे बंद केल्याने, या दारुविक्रेत्यांने फिरती दुकाने चालू करुन चढ्याभावाने विक्री चालू आहे. चढा दर असला तरी देशी दारु दुकाने बंद असल्याने यांच्याकडे दारू खरेदी साठी पिणा-यांच्या रांगा लागत आहेत. येथे आसपासच्या गावांत मिळत नसल्याने गावाबाहेर असलेले झाडाखाली व नदीकाठचा आधार दारु विक्रेते घेत आहेत.
याबाबत गावचे सरपंच तानाजी भोसले म्हणाले कि,गेले पाच वर्षापासुन शित्तूर वारूण गावात संपूर्ण दारुबंदी असून गावात ही शांतत होती. परंतु सध्या चोरुन दारु विक्री चालू असल्याने पुन्हा गावात अशांततेचे वातरण पसरत आहे.
ते पूढे म्हाणाले की आम्हाला आतापर्यंत शाहूवाडी पोलीसाने चांगले सहकार्य केले असून, येथून पुढेही सहकार्य करावे. तसे न झाल्यास आम्हांला गावक-यांना व महिला मंडळाला , गावांतील तरुणांना घेवून पुन्हा आंदोलन करावे लागेल, पण गावात शांतता कायम राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.