बांबवडे त १८ वर्षांवरील नागरिकांसाठी खाजगी कोरोना लस उपलब्ध : दत्तकृपा हॉस्पिटल
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील दत्तकृपा हॉस्पिटल मध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना खाजगी कोरोना लस उपलब्ध झाली आहे. हि लस माफक दरात उपलब्ध असून, इथे मिळणाऱ्या कोरोना लसी साठी शासनाने देखील परवानगी दिली आहे.

शाहुवाडी तालुक्यात पहिली खाजगी कोरोना लस मिळणारे हे एकमेव ठिकाण आहे. अशी माहिती हॉस्पिटल चे डॉ. अमोल शिरगुप्पे ( M.S. obg. & Gyn.) यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

सद्यस्थितीत शासकीय लस उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी हुकत आहे . तसेच अनेक कारणांमुळे लस न मिळाल्याने अनेकांचे नुकसान होत आहे. यासाठी हे खाजगी लसीकरण केंद्र जनतेसाठी माफक दरात उपलब्ध होत आहे. येथील ओपीडी वेळ सकाळी १० ते दु.२.०० व दु. ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दत्तकृपा हॉस्पिटल हे बांबवडे येथील पिशवी रोड ला के.डी.सी.सी. बँकेशेजारी आहे. संपर्क क्र. ९८६०८७३५६८ असा आहे. अशी माहिती देखील डॉ. शिरगुप्पे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.