बांबवडे पुन्हा लॉकडाऊन : एक प्रवाशी पॉझीटीव्ह
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी येथून रविवार दि.२६ एप्रिल रोजी रात्री उशिरा एका इसमास पकडले होते. त्त्याची कोल्हापूर इथं तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आल्याने, बांबवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, बांबवडे संपूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशी माहिती येथील कोरोना समिती चे अध्यक्ष सरपंच सागर कांबळे यांनी दिली.
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं रविवारी रात्री उशिरा चालत निघालेल्या इसमास बांबवडे पोलिसांनी हटकले. त्यास पकडून शाहुवाडी पोलीस ठाणे इथं नेण्यात आले. तिथून त्यास तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या इसमाचा रिपोर्ट आज पॉझीटीव्ह आला आहे. तो इसम येथील रहिवाशी नसून तो रत्नागिरी हून हैद्राबाद ला निघाला होता. त्यानुषंगाने आज बांबवडे पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे.
दरम्यान बांबवडे अंशत: सुरु केले असता, लोकांनी या सवलतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिक व ग्राहक यावेळी सोशल डीस्टंस चा नियम भंग करतानाही आढळून आले.
या सर्वच कारणांमुळे बांबवडे पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय कोरोना समिती च्या वतीने घेण्यात आला आहे.