कोडोली येथे शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील महालक्ष्मी गल्ली येथे राहणारे विलास यशवंत शिताफे वय ५० यांनी परीटकी नावाच्या शेतामध्ये दि.४मे रोजी पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाला कपड्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान विलास शिताफे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा कोडोली येथून गाई खरेदीसाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्ज वसुलीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी गेली तीन दिवस तगादा लावल्याचे, शिताफे यांची मुलगी प्रियांका विलास शिताफे हिने सांगितले. यामुळे शिताफे यांनी वैतागून पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास डॉ.आनंद शिंदे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत..