” बांबवडे बंद ” चा निर्णय व्यापारी असोसिएशन चाच
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दि.५ सप्टेंबर पासून ९ सप्टेंबर पर्यंत सुचविलेला बंद हा बांबवडे व्यावसायिक वेल्फेअर असोसिएशन, बांबवडे यांच्यावतीने उत्स्फुर्तपणे करण्यात येणार आहे. याबाबत बांबवडे कोरोना दक्षता समिती ची कोणतीही बैठक झालेली नसल्याने अनेक सदस्यांना याची कल्पना सुद्धा नाही. अशी माहिती समोर येत आहे. या बंद मध्ये कोणत्याही पतसंस्था,अथवा बँका सामील नसून, बँक व पतसंस्था नियमितपणे सुरु राहतील. अशी माहिती ग्रामपंचायत कार्यालयातून समजत आहे.
याबाबत ग्रामपंचायत कोरोना समिती कडून हा बंद जाहीर करण्यात आलेला नाही. असे उपसरपंच सयाजी निकम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले.