बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खुटाळे
बांबवडे : बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खुटाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष रवींद्र फाटक यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. यामुळे व्यापारी संघटनेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. आज झालेल्या संघटनेच्या बैठकीत हि निवड करण्यात आली. त्याचबरोबर रवींद्र फाटक यांच्या रिक्त पदी त्यांचे चिरंजीव रोहन फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके हे सूचक होते, तर दीपक साडविलकर यांनी यास अनुमोदन दिले..
दरम्यान संघटनेचे सदस्य प्रकाश पाटील यांची साळशी गावाच्या उप सरपंच पदी निवड झाल्याने, संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने नूतन अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे उर्फ आप्पा ,तसेच प्रकाश पाटील यांचे अभिनंदन .


बाळासाहेब खुटाळे यांच्या निवडी नंतर संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान या बैठकीवेळी उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके, सचिव दत्तात्रय यादव, खजानीस शरद बाऊचकर, संचालक सुरेश नारकर, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग वग्रे, राजू बुवा, मधुकर बुवा, राजेंद्र निकम, विजय निकम, विद्यानंद यादव, आनंदा प्रभावळे, दीपक साडविलकर, सतीश काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.