नूतन सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे जल्लोषात स्वागत
मलकापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती पदी सर्जेराव पाटील यांची निवड झाल्यावर शाहुवाडी तालुक्यात जल्लोषी वातावरणात मिरवणुक काढून गुलालाची उधळन आणि फटाक्यांची आताष बाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या शित्तूर वारूण जिल्हा परिषद मतदार संघातून सर्जेराव पाटील यांनी विजय मिळविला होता. जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीची सत्ता येताच, सभापती पदासाठी सर्जेराव पाटील यांच्या नावाला अधिक पसंती होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणूकी कडे तालुका वासियांच्या नजरा लागल्या होत्या.
सर्वसामान्य जनतेतून पुढे आलेले आणि सदैव जनतेसोबत राहणारे नेतृत्व म्हणून सर्जेराव पाटील यांची वाटचाल सुरू असल्याने, त्यांच्या निवडीने तालुक्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शाहुवाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आणि त्याचबरोबर तालुक्याच्या सर्वांगीन विकासाला गती देणार असल्याचे मत, त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नुतन सभापती आणि जिल्हा बॅकेचे संचालक सर्जेराव पाटील यांचे शाहुवाडी तालुक्यात आगमन होताच बांबवडे पासून मलकापूर परिसरात त्यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली.