बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दहा लाख : श्री विजयराव बोरगे
बांबवडे : पिशवी जिल्हा परिषद मतदार संघात जि ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करतील, त्यांना १० लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल, अशी घोषणा जि.प. सदस्य श्री विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केली.

सध्या निवडणूक काळात जो अवाढव्य खर्च होतो. तसेच रोष,क्लेश व विरोध हा समाजात सुरु होतो. त्यामुळे गावातील वातावरण बदलते. आणि पुन्हा केसेस सुरु होतात. कोर्ट कचेऱ्या सुरु होतात. हे सर्व टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक जर बिनविरोध झाली, तर ह्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळेल.

हाच शुद्ध हेतू मनात ठेवून , पिशवी जि.प. मतदारसंघातील निवडणूक लागलेल्या गावांपैकी जि ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक जाहीर करेल, त्या गावाला दहा लाखाचा विकास निधी पुरविण्यात येईल, असा निर्णय घेतला असल्याचे श्री बोरगे यांनी सांगितले.

निश्चितच हि गोष्ट कौतुकास्पद आहे, यासाठी एसपीएस न्यूज च्यावतीने जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.