आवळी गावाची पाणी समस्या लवकरच मार्गी लावू- श्री. शिवाजीराव मोरे
बांबवडे : आवळी गावाला प्रामुख्याने भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या असून, पेयजल योजना आणून लवकरच पूर्णत्वास नेण्यात येईल, यासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. तसेच माजी मंत्री विनय कोरे सावकर यांच्या सहकार्याने आवळी गावांतर्गत रस्त्यांची सुद्धा कामे मार्गी लावण्यात येतील, असे मत जिल्हापरिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांनी व्यक्त केले.
आवळी तालुका पन्हाळा इथं आवळी विद्यामंदिर परिसरात ग्रामपंचायत, संकल्प फौंडेशन , व ग्रामस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी श्री.मोरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, इथं शाळा १ली ते ७ वी अशी आहे. परंतु शाळा खोल्यांची कमतरता असल्याने दोन ठिकाणी शाळा भरवली जाते. शाळेच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने शाळा एकत्र भरणे गरजेचे आहे. यासाठीही प्रयत्न केले जातील.
दरम्यान सध्या पुणे इथं जरी रहात असले,तरी मूळ आवळीकर आहोत,अशी ओळख सांगणारे रवींद्र पाटील यांनी जलयुक्त शिवार योजना गावात आणावी, ज्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर होईल. आम्ही राजकीय दृष्ट्या कुठेही असलो तरी गावाच्या समाजकारणासाठी नेहमीच एकत्र राहू,असेही भाजप चे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी सांगितले.
आवळी गावात सुमारे ४ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. त्याचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पंचायत समितीच्या उपसभापती सौ.उज्वला पाटील, विशेष मार्गदर्शक उत्तम पाटील, सरपंच सौ. कविता कदम, उपसरपंच अनिल पाटील, सदस्य जयवंत कदम, रुपाली पाटील, सौ. शुभांगी क्षीरसागर, शिल्पा पाटील, कल्पना पाटील, छाया पोवार, नामदेव चौगुले, संकल्प फौंडेशन चे रवींद्र पाटील, शंकर पाटील, विलास पाटील, विशाल पाटील, अरविंद पोवार, रमेश कदम, सुरेश कदम, सागर पाटील, अमर नांगरे-पाटील, रामचंद्र पाटील, गणेश बिळास्कर, राजाराम शेटे, वनसेवक अतुल कदम, दिलीप क्षीरसागर, आवळी विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, अध्यापिका , अंगणवाडी सेविका, हायस्कूल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत ग्रामसेवक विद्या पाटील, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.