भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अनुयायांकडून विनम्र अभिवादन
शाहुवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शाहुवाडी पंचायत समिती च्या प्रांगणात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , संविधान, स्तंभ, तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या शिल्पांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना,अखिल भारतीय बुद्धीस्ट महासभा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या असंख्य संघटना, तसेच अनुयायांनी विनम्र अभिवादन केले.


दरम्यान यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून महानावांना अभिवादन केले. दरम्यान शाहुवाडी पंचायत समिती मधील अधिकारी आणि पदाधिकारी मात्र यावेळी अनुपस्थित असल्याचे जाणवले.

यावेळी त्रीसरण पंचशील, बुद्धवंदना म्हणून, अनुयायांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. शाहुवाडी तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे. त्यामुळे इथं जातीभेद अनुभवयास मिळत नाही. कारण शाहू महाराजांच्या नावाचा हा तालुका असून,बहुजन समाजासह सर्वच जातीधर्मांना समान मानले जाते.

यावेळी अभिवादन करताना, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ,तसेच सीताई उद्योग समूहाचे चेअरमन आनंदराव कामत, बबनराव कांबळे, करूंगळेचे उपसरपंच प्रकाश कांबळे, अनिल कांबळे पेरीड, अनिल कांबळे मलकापूर, जालिंदर कांबळे पेरीड, गजेंद्र कांबळे गोगवे भीमशक्ती चे तालुकाध्यक्ष, दामाजी कांबळे शाहुवाडी, दिपक कांबळे मांजरे, बापू कांबळे म्हाळसवडे, सुधाकर चव्हाण प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष , प्रमोद गायकवाड, अरविंद कांबळे उचत, सुरेश कांबळे कोळगावकर, सुभाष कांबळे गेळवडे, यांच्यासहित अनेक अनुयायी यावेळी उपस्थित होते.