धार्मिक दहशतवाद समाजाला घातकच -प्रा.श्रीमंत कोकाटे
बांबवडे ( प्रतिनिधी ) :
दहशतवाद मग तो कोणताही असू दे, तो निश्चितच घटक असतो.गेल्या २५०० वर्षांपासून या देशात सुरु असलेला धार्मिक दहशतवाद हा अत्यंत घटक आहे, असे मत प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
शाहुवाडी इथं शाहुवाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व मानवांच्या सार्वजनिक जयंती कार्यक्रमात प्रा. कोकाटे बोलत होते.राज्याचे निवृत्त वित्तीय सल्लागार व बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष सुरेशराव गायकवाड हे, अध्यक्षस्थानी होते.
सेवा संघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. बापूसाहेब कांबळे यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात सेवा संघाच्या एकूण कार्याचा आढावा घेतला.
प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी तथागत गौतम बुद्धांपासून समाज उद्धाराचे कार्य करणाऱ्या सर्वच महामानवांच्या कार्याचा आढावा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यावान होते.त्यांनी समाजातील सर्व लोकांच्या हक्क व कल्याणासाठी संविधान लिहिले. परंतु आज ते संविधान धोक्यात आले आहे. समाजाचे न्याय व हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न होण्याचा धोका त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रा. प्रकाश नाईक म्हणाले कि, भारतात केवळ बोलण्यापुरती सामाजिक समता आहे.परंतु हे थोतांड आहे. सध्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात असणारी विषमता नष्ट होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव गायकवाड म्हणले कि, शाहुवाडी तालुका बौद्ध सेवा संघ तळागाळातील बहुजन समाजाच्या सेवेसाठी बांधील आहे.
यावेळी विजय कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सर्वच महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमास सेवा निवृत्त शंकरराव सातपुते, भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे, भाई भारत पाटील, शिवाजी खोत, चंद्रकांत पाटील, संदीप कांबळे, शिवाजी रेडेकर, गिरीश कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनील कांबळे, भागोजी कांबळे, संजय नलावडे, अशोक गायकवाड, दगडू माळी, जगन्नाथ नलवडे, आनंदा कांबळे, मधुकर कांबळे, सुदाम कांबळे, सहदेव गायकवाड, विनायक कांबळे, यांच्यासह तालुक्यातील विविध गावातून ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रकाश कांबळे यांनी समाज बांधवांना भोजन दान दिले.
डॉ. बापूसाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले,तर सुहास कोल्हापुरे यांनी आभार मानले.