भास्कर हॉस्पिटल च्यावतीने मोफत मुळव्याध तपासणी शिबीर : २३ मार्च ते ३० मार्च
बांबवडे : भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने बांबवडे इथं मोफत मुळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २३ मार्च ते ३० मार्च २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती हॉस्पिटल चे डॉक्टर दिलखुष तांबोळी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

बांबवडे पंचक्रोशीत भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल हे आयुर्वेदावर उपचार करणारे नामवंत हॉस्पिटल असून, इथं आयुर्वेदिक उपचार पद्धतीने व्याधींवर उपचार केले जातात. सध्याच्या ग्लोबल वातावरणामुळे वातावरणात वाढलेली उष्णता, तसेच शरीरातील उष्णता , यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातल्या त्यात मुळव्याध हि व्याधी किचकट आहे. याचे लवकर निदान न झाल्यास, त्याचे भयंकर परिणाम लोकांना सोसावे लागतात. यासाठीच भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने मुळव्याध तपासणी शिबीर मोफत आयोजित केले असून, लोकांना त्याचा लाभ व्हावा. तसेच नागरिक या व्याधीतून लवकर मोकळे व्हावेत, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून , या शिबिराचे आयोजन२३ मार्च ते ३० मार्च पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत.

इथं मुळव्याध- भगंदर तज्ञ डॉ. दिपक मगदूम MD. ( Ayu) C.K.S. Consultant Ayurveda Proctologist यावर उपचार करतात.

इथं दर बुधवारी मुळव्याध (Piles), भगंदर (Fistula ),फिशर (Fissure ), पायलोनीडल सायनस, या आजाराचे रुग्ण तपासणार आहेत. तसेच या शिबिरात नोंद झालेली ऑपरेशन फक्त ९९९९/- रुपयांमध्ये करण्यात येतील. तसेच शिबिरामध्ये निवडक पेशंट साठी दुर्बिणीद्वारे मुळव्याध तपासणी ( Video Proctoscopy )मोफत करण्यात येईल.

या हॉस्पिटल च्या वतीने गुढघेदुखी, संधिवात, तसेच अनेक व्याधींवर आयुर्वेदिक उपचार केले जातात. पंचकर्म तसेच इतरही उपचार हॉस्पिटल च्यावतीने करण्यात येतात. असेही भास्कर हॉस्पिटल चे डॉक्टर दिलखुष तांबोळी यांनी सांगितले. हे हॉस्पिटल बांबवडे ग्रामपंचायत समोर असलेल्या गाडवे बिल्डिंगमध्ये, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आहे.

अधिक माहितीसाठी नोंदणीकरिता 7276009051 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भास्कर हॉस्पिटल च्यावतीने करण्यात आले आहे.