‘ मराठवाडी ‘ इथं भरदुपारी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
आरळा (सागर नांगरे ) : शिराळा तालुक्यातील मराठवाडी इथं भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्यामुळे एक गाभण शेळी मृत्युमुखी पडली आहे.

” मराठवाडी ” म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुका आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका यांना जोडणारे एक गाव होय. येथील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यामुळे शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गाय, ,म्हैस, शेळी अशा जनावरांचे पालनपोषण करून त्यांना जीवापाड जपतात. आणि अडीनडीला त्यांची विक्री करून, आपली गरज भागवतात. हि गावं तसं पाहायला गेलो, तर जंगलांपासून फार लांब नाहीत. म्हणूनच जंगली जनावरे म्हणजेच बिबट्या, कोल्हे अशी जंगली जनावरे, शेतकरी तसेच त्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करतात.

अशाच हल्ल्यात मराठवाडी येथील मारुती बाळू मोरे हे आपल्या शेळ्या मेंढ्यांना चारावयास घेवून शेतात गेले होते. त्याच दरम्यान बिबट्या च्या झालेल्या हल्ल्यात गाभण शेळी भर दुपारी बळी पडली. सदर घटनेची माहिती शासकीय विभागाला समजताच श्री शिवाजी पाटील, सुभाष पाटील हे घटनास्थळी पोहचले. तेथील घटनेची माहिती घेवून शासकीय प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली.

दरम्यान शासनाने त्या शेतकऱ्याला मदत करावी, अशीच अपेक्षा येथील जनतेतून व्यक्त केली जात आहे.