राजकीयसामाजिक

मलकापुरात ” आनंदाचा शिधा ” वाटप


मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं उशिरा का होईना, ” आनंदाचा शिधा ” स्वस्त रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वाटण्यात आला.
राज्य सरकार च्या वतीने १०० रुपयात दिवाळी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु दिवाळी पूर्वी हि योजना सुरु झाली नव्हती. परंतु उशिरा का होईना, आनंदाचा शिधा वाटण्यात आला.


मलकापूर येथील स्वस्त रेशन धान्य दुकानाच्यावातीने मलकापुरातील लाभार्थ्यांना नगरसेवक प्रवीण प्रभावळकर यांच्या हस्ते वाटपाची सुरुवात करण्यात आली. येथील सुमरे ५१७ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.


यावेळी विकास देशमाने, नंदू कोठावळे, आनंदा गिरी, प्रशांत शिंदे व नागरिक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!