मलकापुरात महाआरती युवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील हनुमान मंदिरात महाआरती संपन्न झाली.

सध्या राज्यभर गाजत असलेला भोंगे हटाव आंदोलनाला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर यांच्यावतीने मलकापुरातील हनुमान मंदिरात महाआरती झाली. यावेळी मनसे चे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या महाआरती नंतर मनसे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शाहुवाडी पोलीस ठाणे इथे नेले.

या महाआरती मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकार सेनेचे उपाध्यक्ष सतीश तांदळे, धनाजी आगलावे, प्रवीण कांबळे, रोहित जांभळे, मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव, बाळासाहेब कदम, डॉ. संजय गांधी, प्रदीप वीर, चेतन गुजर, महेश विभूते, व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.