” मलकापूर ते सौंदत्ती ” एसटी बस सुरु करण्याची जनतेतून मागणी
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील एकमेव एसटी आगार असलेल्या मलकापूर आगारामधून सौंदत्ती इथे नवी एसटी बस सुरु व्हावी, अशी मागणी तालुकावासियांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकातून विशाळगड, रत्नागिरी आदींसाठी एसटी सुरु आहे. अशा पद्धतीने कर्नाटकातून अनेक बस महाराष्ट्रात येत आहेत.
कर्नाटकातील सौंदत्ती इथं रेणुकादेवी चं स्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांची रेणुकादेवी वर श्रद्धा आहे. प्रती वर्षी अनेक भाविक इथं देवदर्शनासाठी येत असतात. इथं थेट बस नसल्याने, लोकांना खाजगी प्रवासी वाहनांनी सौंदत्ती ला जावे लागते. यामुळे लोकांकडून अधिक पैसे घेतले जातात.

त्यामुळे ” मलकापूर ते सौंदत्ती ” एसटी बस मलकापूर आगार प्रमुखांनी सुरु केल्यास, भाविकांना दर्शन घडविल्याचे समाधान मिळेल, त्याचबरोबर एसटी चे उत्पन्न देखील वाढेल. तेंव्हा हि बस सुरु करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.