राजकीयसामाजिक

मलकापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण -कारवाई ची मागणी


मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने एक निवेदन मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. विद्या कदम यांना देण्यात आले, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद हि एकमेव नगर परिषद आहे. सोमवार दिनांक २१ मार्च रोजी नगर परिषदेचे काम करीत असताना परिषदेचे कर्मचारी मारुती शामराव पवार यांना मैत्री कलेक्शन कापड दुकान मलकापूर यांचे लता संजय चौगुले व अक्षय संजय चौगुले यांनी कामात अडथळा आणत उपरोक्त कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत, मारहाण केली. यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे, अशी विचारणा होत आहे. तसेच पालिका प्रशासनाने संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सदर च्या निवेदनात करण्यात आली आहे.


निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार शाहुवाडी, तसेच पोलीस निरीक्षक शाहुवाडी पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.


हे निवेदन देताना भाजप चे कार्यकर्ते प्रवीण प्रभावळकर, रमेश चांदणे, मनसे चे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर, रोहित जांभळे व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!