…मला वजीर उभारायचे आहेत – श्री ओंकार चौगुले
बांबवडे : युवा पिढीला नेहमीच प्यादं म्हणून वापरलं जातं. परंतु हेच प्यादं आपल्या कर्तुत्वातून अनेक घरं पार करून जातं, तेंव्हा त्याचं वजिरात रुपांतर होतं. मला ते वजीर जनतेसमोर आणायचे आहेत. आणि या पिढीला सक्षम करायचे आहे. असे मत शिवसेना पक्षाचे कोडोली जिल्हापरिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री ओंकार महादेव चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
यावेळी त्यांनी अनेक मते आपल्या मुलाखतीत मांडली आहेत. संघठन करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जाणे, गरजेचे आहे. यासाठी आपली उमेदवारी शिवसेनेचे श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केली आहे. ९० % समाजकारण आणि आणि १० % राजकारण हे आमचे समीकरण आहे. यासाठी युवा पिढी सक्षम झाली पाहिजे. भविष्यात शेतकरी हाच खरा या देशाचा पाया आहे. फक्त त्याला तांत्रिक दृष्ट्या प्रगत करणे, हि काळाची गरज आहे. यानंतर स्वच्छता आणि परिसर हे खरे या निवडणुकीचे टप्पे आहेत. असेही श्री ओंकार चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
