महाविकास आघाडी च्यावतीने घोषणाबाजी बांबवडे इथं ” महाराष्ट्र बंद “
बांबवडे : महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद पुकारला असून, यास बांबवडे इथं पाठींबा देण्यासाठी मह्विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध करीत घोषणाबाजी केली.

उत्तरप्रदेश मधील लखीमपुर इथं आंदोलक शेतकऱ्यांवर एका मंत्री पुत्राने जीप घातल्याने ९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ हा बंद आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी म्हणाले कि, केंद्रशासनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांभाळता आले नाही. शेतकऱ्यांच्या ज्या हत्या झाल्या ,त्यांच्या निषेधार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,तसेच शरद पवार साहेब ,व थोरात साहेब यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली. त्यांच्या समर्थनार्थ आजचा बंद यशस्वी झालाच पाहिजे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद ला आमचा पूर्ण पाठींबा आहे. आणि त्यामुळे बंद यशस्वी होईल यात शंका नाही.

यावेळी शिवसेनेचे विजय लाटकर, सचिन मूडशिंगकर , तुषार पाटील, शाहीर अनिल तळप, शरद निकम, महिला आघाडी च्या अलका भालेकर, सौ सुवर्णा दाभोळकर, आदी शिवसैनिक तसेच कॉंग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष शामराव कांबळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान येथील व्यापारी असोसिएशन चे कार्यकर्ते यांनी देखील या बंद ला पाठींबा असल्याचे सांगितले. यावेळी रोहन फाटक, शरद बाऊचकर, राजेंद्र निकम, आनंदा प्रभावळे , गजानन निकम आदी व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.