शाहुवाडी पंचायत समिती सभापती पदाचे दावेदार कोण ?
शाहुवाडी पंचायत समिती वर आम.सत्यजित पाटील सरुडकर व मानसिंग दादा गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पंचायत समिती वर भगवा फडकत आहे. आता सभापती पदाचे दावेदार कोण? हा प्रश्न चर्चेला येवू लागला आहे. कारण शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला खुल्या वर्गासाठी आरक्षित आहे.
या अगोदर शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती पद सरूड पंचायत समिती गणाच्या विजयी उमेदवार सौ. लतादेवी जालिंदर पाटील यांनी उपभोगले असून, त्या पदाचा त्यांना अनुभव आहे. तर पिशवी गणातून विजयी झालेल्या सौ.अश्विनी संदीप पाटील या पहिल्यांदाच निवडून आल्या असून नवोदित आहेत. तरीही नव्या तरुण उमेदवाराला संधी मिळते कि, अनुभवींना स्थान मिळते, हा चर्चेचा विषय आहे.